सांगली | प्रतिनिधी

सांगली : बुधवार दि.६/११/२०२४ रोजी सांगली मतदारसंघातील महायुती भाजपाचे उमेदवार सुधीरदादा गाडगीळ यांनी भव्य रॅली काढली, हलगीढोल तास्यावर कार्यकर्त्यांनी ताल धरला. महिलांनी ही ताल धरला. सुधीरदादा जोरदार शक्तीप्रदर्शन केले. सांगलीचे आराध्य श्री गणरायाच्या आशिवार्द घेऊन प्रचार शुभारंभांची सुरवात केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मारुती मंदिर समोर सभा आयोजित केली.

सुधीरदादा गाडगीळ
मी कोणावरही टीका करणार नाही, येणाऱ्या पाच वर्षात माझ्या विकास कामातूनच टीकाकर्त्यांना उत्तर देणार…सभेतिल जनसमुदायबघून सुधीरदादा गाडगीळ म्हणाले अक्षरशः माझ्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या जनसमुदाय पाहून निःशब्द झालो.
आणि सामान्य जनतेच्या सर्व सुखासाठी असणारे आपल्या रयतेचे महायुती सरकार निवडून आणण्याचा एकत्रितपणे वादा केला.

यावेळी उपस्थित मान्यवर पदाधिकारी आणि जमलेले माझी सांगलीकर जनता यांनी माझ्यावर दाखवलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल सुधीरदादांनी सर्वांचे आभार मानले.