🔺कुपवाड पोलीस ठाण्यात उद्योजकांची समस्या बाबत संवाद बैठक

कुपवाड, ता.७ : शहर परिसर व औद्योगिक क्षेत्रात गुन्हेगारी वाढली असून गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक पाहिजे असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील कुपवाड पोलीस ठाण्यात घेण्यात आलेल्या उधोजक संवाद मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी पोलीसप्रमुख संदीप घुगे, माजी आमदार दिनकर पाटील, अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर, मिरजेचे उपाधीक्षक प्रनील गिल्डा, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, कुपवाडचे सहाय्यक निरीक्षक दीपक भांडवलकर, औद्योगिक महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे आदी उपस्थित होतो.

पुढे बोलताना पालकमंत्री म्हणाले जिल्ह्यात गुन्हे होत आहेत त्याचे डिटेक्शन पण होत आहे. पण गुन्हा होऊ नये यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावा. कुपवाड शहर परिसर व औधोगिक क्षेत्रात क्राईम रेट वाढला आहे. बहुतांश गुन्हे हे कौटुंबिक व अनैतिक कारणातून होत आहेत. औद्योगिक क्षेत्रात कारखान्याची संख्या जास्त आहे. कामगारांची पार्श्वभूमी व त्यांच्यातील अंतर्गत वाद माहीत नसल्याने गुन्हे घडत आहेत. स्ट्रीट लाईट, सिसिटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहे. औधोगिक क्षेत्र व भाडे तत्वावर रूम देणाऱ्या मालकांकडे कामगारांची केवायसी केली जात नाहीत. त्यामुळे त्यांची पार्श्वभूमी माहित नसल्याने गुन्हे होत आहेत.
- गुन्हेगारीचा क्राईम रेट कमी करण्यासाठी
गुन्हेगारीचा क्राइम रेट कमी करायचे असेल तर पोलिसांना गुन्हेगारांवर आपला धाक निर्माण करायला पाहिजे. औद्योगिक क्षेत्रातील व भाडेतत्त्वावर रूम दिलेल्या मालकांनी कामगारांची केवायसी करणे गरजेचे आहे व त्यांची माहिती स्थानिक पोलिसात देणे आवश्यक आहे. क्षेत्रात व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, डार्क स्पॉट सारख्या ठिकाणी स्ट्रीट लाईट व कॅमेरे बसवावेत. पोलिसांचा गस्त वाढवावा.
- उपाय योजना
यावर उपाययोजना करिता जिल्ह्यातील प्रत्येक गावात अस्तित्वात असणाऱ्या सर्व तंटामुक्त समिती सक्षमपणे कार्यान्वित करणार आहे. त्याची सुरुवात येत्या स्वातंत्र्य दिनापासून करण्यात येईल. तसेच पोलीस पाटील काय करतात? याची झाडाझडतीही केली जाणार आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी टास्क फोर्स तयार करण्यात आलेला आहे. -पालकमंत्री चंद्रकांत पाटील
उद्योजकांच्या समस्या व अडचणी
संवाद मेळाव्यात उद्योजकांना येणाऱ्या अडचणी व समस्या पालकमंत्री यांना सांगण्यात आले.


गुरुवारी (ता. ७) कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात उद्योजक बैठक घेण्यात आली. अशी बैठक यापुढे आठवड्यातून एकदा प्रत्येक पोलीस ठाण्यात घेण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. यातून ज्या त्या पोलिस ठाण्यात प्रशासन आणि नागरिक यांच्याशी समस्या विषयक संवाद साधून उपाययोजना करता येतील, असे आश्वासित केले.

यावेळी मिरज औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील, माजी अध्यक्ष संजय अराणके , मराठा उद्योजक फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, उद्योजक डि.के.चौगुले, मनोज भोसले, रमेश आरवाडे, फुलचंद शिंदे यासह अन्य उद्योजक उपस्थित होते.