
खटाव, ता.६ : (ता- मिरज) मधील ग्रामसेवकांवर कारवाई बाबत परशुराम बनसोडे यांनी आज मुंबईत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन दिले. या निवेदनात असे म्हणले आहे की, सन २०२३-२४ मधील १७ कामांचा निविदा प्रक्रियेतील अनियमितते बाबत पुरावे जोडुन आपले म्हणणे सादर केले होते. सदर १७ कामांचा निविदा प्रक्रियेत अनियमितता झाली असले बाबत चौकशी अहवालात स्पष्ठपणे नमुद करण्यात आले आहे.
तसेच त्यावेळी खटाव ग्रामपंचायत पोट निवडणुकीची अचार संहिता सुरु असताना अचार संहितेचा उलंघन ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडुन झाले असलेले स्पष्ट होऊन ही अद्याप संबधित अधिकारी यांच्यावर कारवाई झालेली नाही. तसेच सदर ग्रामसेवक स्वतः ठेकेदार म्हणुन काम केले आहे. ठेकेदाराकडुन निघालेल्या बिलाची सर्व रक्कम ग्रामसेवक यांनी स्वतःच्या बँक खात्यात पैसे घेतले.
ग्रामपंचायत खटाव ता. मिरज, जि. सांगली येथील ग्रामपंचायत अधिकारी संजयकुमार गोपाळ गायकवाड यांनी केलेल्या अनियमितता व भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी अहवाल नुसार तत्काळ ग्रामसेवक यांना निलंबीत करावे अन्यथा १५ ऑगस्ट २०२५ रोजी मंत्रालय मुंबई येथे आत्मदहन करीत असल्याचे पत्रकात स्पष्ट केले आहे.
