ग्रामसेवक गायकवाड यांच्यावर कारवाईसाठी परशुराम बनसोडेंची मंत्रालयात धाव

खटाव, ता.५ : तालुका मिरज येथील ग्रामविकास अधिकारी संजय कुमार गायकवाड यांच्या कामात अनिमित असून त्यांनी भ्रष्टाचार केला असल्याने त्यांच्या कारवाईसाठी आज बुधवार (ता.६) रोजी परशुराम बनसोडे यांनी मंत्रालयात धाव घेतली आहे.

दोन दिवसांपूर्वी सोमवारी (ता.४) खटाव तालुका मिरज येथील चौकशी अहवालामध्ये दोष असणाऱ्या ग्रामविकास अधिकारी संजय कुमार गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रशासनाचा दालण्यात पेट्रोल ओतून आत्मदेहनचा प्रयत्न केला होता व प्रशासनास इशारा दिला होता की, दोषी अधिकऱ्यांवर कारवाई केली नाही तर येणाऱ्या १५ ऑगस्ट रोजी मंत्रालयात पुन्हा आत्मदहन करणार असल्याच्या इशारा दिला होता.

बनसोडे यांनी सांगितले की, सुरुवातीच्या काळात ग्रामसेवक चांगल्या पद्धतीने काम करत होते. नंतर नंतर त्यांनी स्वता ठेकेदारी करणेस सुरवात केली. त्यांचा या ठेकेदारीला पंचायत मधील विरोधी पक्षाचे नेते सदस्य संजय कागवाडे व परशुराम बनसोडे यांनी एकत्र येऊन विरोध करून भ्रष्टाचार रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या या विरोधाला पायधुळी तुडवत ग्रामसेवकांनी आपला मनमानी कारभार चालूच ठेवला आणि ठेकेदारीचे दुकान सुरूच ठेवले. ह्या सर्व गोष्टी करताना विरोधी पक्षाला विचारात न घेता ग्रामपंचायत मधील ठराव मासिक मिटिंग ग्रामसेवक आणि सरपंच फक्त दोघेच करू लागले. असा आरोप बनसोडे यांनी केला.

भ्रष्टाचार रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्यालाच सरपंच महोदय नोटंकी म्हणत असेल तर ते पूर्ण चुकीचे बनसोडे म्हणले. पुढे बोलताना बनसोडे म्हणाले की, आता वेळ आली आहे की सोमेश्वर तीर्थक्षेत्र मंदिरामध्ये किती भ्रष्टाचार केला हे दाखवण्याची.

खटाव गावातील सिमेंटच्या रस्त्याला नांगर मारण्याचे वेळ तुमच्यावर येते हे कितीच खेदजनक आहे पहा…….

खटाव गावात ग्रामविकास अधिकारी स्वतः ठेकेदार म्हणून काम करण्यास सुरुवात केली आहे. वेळोवेळी आम्ही विरोधी पक्षाने विरोध करून देखील मनमानी कारभार सुरूच ठेवला आहे. आता सिद्ध झाले आहे गट विकास अधिकारी यांनी चौकशी करून अहवालामध्ये अस्पष्टपणे नमूद केले आहे खटाव ग्रामपंचायत मध्ये अनिमित्त व मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाले आहे. खटाव गावात १४ लाख रुपये खर्च स्मशानभूमी शेजारी वडापात्रावर रस्ता करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य व आम्ही विरोध करून देखील ग्रामसेवकांनी रस्ता केला. चौकशी अहवालामध्ये त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

संबधित अधिकारी कॉल रेकॉर्डिंग वायरल करून सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न आहेत. आमचे भूमिका हे सर्व जनतेच्या हितासाठी आहे त्यामुळे अशा भुलतापणा बळी न पडता खटावकर जनता हे सुज्ञ आहे. येणाऱ्या काळात सुद्धा अशाच पद्धतीने खटाव ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचार रोखण्यात प्रयत्न करणार असल्याचे बनसोडे यांनी सांगितले आहे.

यासाठी आम्ही सर्व विरोधी सदस्य व नेते मंडळी खटाव ग्रामपंचायत बरखास्त करण्यासाठी दोष असणाऱ्या ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर कारवाई करण्यासाठी माननीय उच्च न्यायालय मध्ये पिटीशन दाखल करणार आहे. याबाबत ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्याकडे कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.

येणाऱ्या पंधरा तारखेला मंत्रालय मुंबई या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कारवाई न झाल्यास आत्मदहन करणार व माझ्या जिवितास जर काही बरे वाईट झाल्यास ग्रामविकास अधिकारी सरपंच जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन यांना जबाबदार धरावे असे परशुराम बनसोडे म्हणाले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button