आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थिती: सांगली जिल्हा पुरवठा विभागामार्फत २४ तास नियंत्रण कक्ष सुरू


सांगली, प्रतिनिधी, ता. १० : सध्या आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य आणि तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये आणि वितरण व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी कार्यालयात २४ तास कार्यरत असणारा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.


तक्रारींसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर
जिल्ह्यातील नागरिकांना इंधन किंवा अन्नधान्य पुरवठ्याबाबत काही अडचणी असल्यास प्रशासनाने खालील संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत:
एलपीजी (LPG) गॅस तक्रारींसाठी: १८००२३३३५५५ (टोल-फ्री हेल्पलाईन)
इतर अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी: ०२३३-२६००५०० (लँडलाईन क्रमांक)


अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई
युद्धाच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काही घटक जीवनावश्यक वस्तूंचा साठा करणे किंवा महागाईबाबत चुकीची माहिती पसरवण्याची शक्यता असते. अशा प्रकारे चुकीची माहिती किंवा अफवा पसरवणाऱ्या व्यक्तींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.


प्रशासनाचे आवाहन
“नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. नागरिकांनी संयम बाळगावा आणि कोणत्याही तक्रारी असल्यास थेट नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून प्रशासनास सहकार्य करावे,” असे आवाहन प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांनी केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button