
कुपवाड, ता.८: किरकोळ वाद भवला; मित्रानेच मित्राचा दगडाने काटा काढला. प्रतापने मयूरच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला. सदर घटना गुरुवार (ता.७) सकाळी उघडकीस आली. खून झालेली युवकाचे नाव मयूर सचिन साठे, वय २४ वर्ष, रा. सोनी, तालुका मिरज असे असून त्याचा मित्र प्रताप राजेंद्र चव्हाण वय २४ वर्ष, व्यवसाय – संजय इंडिस्ट्रिजमध्ये वाचमन, रा. सोनी, ता.मिरज याने मयूर चा खून केला आहे. सदर घटनेची कुपवाड पोलिसात नोंद झाली आहे.

पोलिसांच्या अधिक माहितीनुसार मयत मयूर साठे व संसयित आरोपी प्रताप चव्हाण हे दोघे मित्र होते. दोघेही एकाच गावात राहत होते. बुधवार दुपारपासून दोघे एकत्र फिरत होते. बुधवारी दोघांनी मिरजमधील एका हॉटेलमध्ये खाणे पिणे केले. दोघेही दारूच्या नशेत धूत होते. पैशाच्या किरकोळ कारणातून दोघात वाद झाला. वाद झाल्यानंतर दोघेही हॉटेल मधून निघून कुपवाड औधोगिक वसाहतमधील वीज महावितरण जवळ आले.
बोलता बोलता परत त्यांच्यात पैशावरून वाद झाला. या वादात मयूर प्रतापला मारण्यास अंगावर धावून गेला. प्रताप ने मयूरला खाली पाडले व जवळील दगड घेऊन मयूरच्या डोक्यात आणि तोंडावर घातला. यात मयूरचा जागीच मृत्यू होऊन तो रक्ताच्या थारोळ्यात महावितरण रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या गटरीत गवताच झुडपात पडला. सदर घटना बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली असून गुरुवारी सकाळी उघडकीस आली. संसयित आरोपी स्वतःहून कुपवाड पोलिसात हजर झाला. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. सदर घटना समजतात कुपवाड पोलीस घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह आयुष्य टीमचे मदतीने शेवविच्छेदनास पाठीविले.

घटनास्थळी पोलीस प्रमुख संदीप घुगे, मिरज उपाधीक्षक प्रणील गिल्डा यांनी पाहणी करून पोलिसांना गस्त वाढविण्याबाबत सूचना केली. सदर घटनेची कुपवाड पोलिसात नोंद झाली असून या पुढील अधिक तपास मिरज पोलीस उपाधीक्षक प्रणील गिल्डा हे करित आहेत.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील

जिल्ह्यासह कुपवाडात क्राईम रेटचे प्रमाण वाढले आहे. क्राइम रेट व गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक पाहिजे. बहुतांश गुन्हे हे कौटुंबिक व अनैतिक या करणातून होत आहे. गुन्हे होतात त्याचे डिटेक्शन होते पण गुन्हा होऊ नये यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावा. औधोगिक क्षेत्रात कारखाने जास्त असल्याने कामगारांची पार्श्वभूमी तपासावी व त्याची माहिती पोलिसात देण्यात यावी. सीसीटीव्ही कॅमेरा, स्ट्रीट लाईट बसवावे. वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी टास्क फोर्स सुरु केले असल्याचे सांगितले. कुपवाड पोलिस ठाण्यात घेण्यात आलेल्या उद्योजक संवाद मेळाव्यात पालकमंत्री बोलत होते.
आठ महिन्यात आठ खून
कुपवाड शहर, परिसर व औधोगिक क्षेत्रात चोरी, लूटमार, खून खुनाचे सत्र सुरूच आहे. आठ महिन्यात आठ खून झाले आहेत. यातील आज झालेल्या मयूर साठेचा खून आणि यापूर्वी झालेल्या उमेश पाटील याचा खून पोलीस स्थानकाच्या अवघ्या काही अंतरावर झाला आहे. कौटुंबिक, अनैतिक व किरकोळ वादातुन हे खून झाले आहेत.