
कुपवाड, ता.८: नांदणी मटातील महादेवी हत्तीनीला गुजरातमधील वनतारात रवानगी केल्याच्या निषेधार्थ बुधवार (ता.६) रोजी सकाळी समस्त जैन समाज व शहरातील सर्वपक्षीय नेतेमंडळी, कार्यकर्ते, विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी, नागरिकांनी शहरातील सर्व प्रमुख मार्गावरून मूक मोर्चा काढण्यात आला. हत्तीनीला परत नांदणी मठात आणण्यासाठी सर्व पक्षीय एकत्रित येऊन या मोर्चास सहभागी झाले.मोर्चा शहरातील मोठी जैन गल्ली, लिंगायत गल्ली, मिरज रोड, थोरला गणपती चौकमार्गे मोर्चा काढण्यात आला. सोसायटी चौकात मोर्चाची सांगता करण्यात आली.

मोर्चा संपन्न झाल्यानंतर जैन बांधव व सर्व पक्षीय नेतेमंडळी, पदाधिकाऱ्यांनी हत्तीनीला परत आणण्याबाबत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना निवेदन दिले.
.