
कुपवाड, ता.८: ऋतुजा राजगेच्या सासू सासऱ्याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला. ख्रिश्चन धर्मांतरासाठी पती, सासू व सासर्याच्या छळला कंटाळून झाल्याने शहरातील ऋतुजा ऊर्फ गौरी सुकुमार राजगे (वय २८,रा.अश्विनी हौसिंग सोसायटी, यशवंतनगर, कुपवाड) हिने ६ जून २०२५ रोजी गळफास लावून आत्महत्या केली होती. याप्रकरणी गुन्ह्यातील संशयित सासू व सासरा या दोघांचा जामीन अर्ज सांगलीच्या जिल्हा न्यायालयाने बुधवारी (ता. 6) रोजी फेटाळला.
जिल्हा न्यायाधीश सु.रा.पडवळ यांनी हा आदेश सुनावला. राजगे प्रकारणी ऋतुजा च पती सुकुमार सुरेश राजगे (वय २९), सासू अलका सुरेश राजगे (वय ४९),सासरा सुरेश राजाराम राजगे ( वय ५३,सर्व रा.अश्विनी हौसिंग सोसायटी, यशवंतनगर, कुपवाड) या तिघांना कुपवाड पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणी सध्या तिघेही कारागृहात आहेत. सासू-सासरा या दोघांनी जामीनसाठी जिल्हा न्यायालयात मंगळवारी ५ ऑगस्ट रोजी अर्ज दाखल केला होता.
बुधवारी (ता.६) रोजी जिल्हा न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी झाली. सुनावणीनंतर जिल्हा न्यायाधीश सु.रा.पडवळ यांनी सासू व सासरा या दोघांचा जामीन अर्ज फेटाळला.