
बेशिस्तपणा खपवून घेणार नाही, शहर स्वच्छता ही प्राथमिकता असणार आहे, नागरिकांच्या तक्रारीची वेळेत दखल घेऊन कारवाई करणार – सत्यम गांधी आयुक्त
सांगली, ता.९: आयुक्तांची कारवाई; दोन मुकादम निलंबित, स्वच्छता निरीक्षक यांच्या दोन वेतन वाढ तहकूब. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय १,२,३ व ४ मधील विविध वॉर्डमध्ये दिनांक १९/०७/२०२५ रोजी मनपा आयुक्त यांनी समक्षात फिरती केली होती. बऱ्याचशा ठिकाणी उघड्यावर कचरा पडल्याचे निदर्शनास आलेले होते. दैनंदिन कचरा उठाव केला जात नसलेचे तसेच वॉर्डामधील दैनंदीन स्वच्छतेचे कामकाज प्रभाविपणे होत नाही. ही बाब निदर्शनास आल्याने तसेच प्रशासनाकडून सोपविण्यात आलेली जबाबदारी व पदिय कर्तव्ये नियमीतपणे काही मुकादम पार पाडीत नसलेचे निदर्शनास आले होते .
वारंवार सूचना देऊन ही काही मुकादम यांनी आपल्या कामात सुधारणा केलेली नव्हती ही बाब निदर्शनास आले वरून प्रभाग समिती क्र २ , वार्ड क्र १९ मधील मुकादम किरण धनपाल मोरे तसेच
प्रभाग समिती क्र ३ , वार्ड क्र ९ मधील मुकादम बाबासाहेब जयवंत गायकवाड यांना आयुक्त सत्यम गांधी यांनी निलंबित केले.
वार्ड क्रमांक दोन मधील स्वच्छता निरीक्षक श्रीमती अंजली कुदळे यांची दोन वेतन वाढ तहकूब केली आहे. सदरची कारवाई आयुक्तांनी केली आहे. नागरिकाच्या तक्रारी कमी होण्याच्या दृष्टीने प्रशासन प्रभाविपणे कामकाज करण्याच्या दृष्टीने दर सोमवारी उप आयुक्त तर मंगळवार या दिवशी उप आयुक्त मा आयुक्त यांनी दिल्या सूचनेनुसार आढावा घेणार आहेत.
नागरी समस्या आणि तक्रारी निवारण करण्यासाठी देखील नागरी संवाद आयोजित करण्यात येत आहे. नागरिकांच्या समस्या कमी करणे व प्रशासनाच्या वतीने चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे याबाबत प्रशासन सर्व प्रयत्न करणार आहे.