
कर विभागाची नोटीस: सत्वर कर भरावा अन्यथा नळ कनेक्शन तोडले जाणार; जप्ती कारवाई नंतर प्रतिसाद देणार नाहीत त्यांच्या मिळकत लिलाव प्रक्रिया पूर्ण होणार – सत्यम गांधी आयुक्त
सांगली, ता.९: घरपट्टी विभागाने थकीत कर वसुली मोहीम तीव्र करून सांगली विभागात ३ तर मिरज विभागाकडील १ मिळकत जप्तीची धडक कारवाई केली. मिरज विभागाकडील ३० लाख इतकी वसुली केली आहे. सहा. आयुक्त आकाश डोईफोडे आणि त्यांची टीम यांनी दि ६/८/२०२५ पासून कर वसुली बाबत अति. आयुक्त निलेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निश्चित केलेली टॉप थकबाकीदार यांच्या कडून थकबाकी वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. जप्ती कारवाई मोहीम देखील तीव्र केली आहे.
या कारवाईत अनिस मुल्ला, सहा. आयुक्त कर अधिक्षक वाहिद मुल्ला, मोहन कलगुडगी, जप्ती अधीकारी शिवाजी शिंदे , आरिफ तांबोळी, राजरतन चव्हाण, निखिल चोपडे, विनायक खेरमोडे इत्यादी कर्मचारी अधिकारी सहभागी घेतला आहे.