नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रात३५ ठिकाणी रविवारी विशेष स्वच्छता, सुशोभिकरण मोहीम

सांगली, ता.९: संपूर्ण सांगली जिल्ह्यातील ११ नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रांमध्ये दिनांक १० ऑगस्ट २०२५ रोजी एकाच दिवशी विशेष स्वच्छता व सुशोभीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत एकूण ३५ ठिकाणी स्वच्छता, सुशोभिकरण, प्लास्टिक निर्मूलन, सौंदर्यीकरण, वृक्षारोपण, रंगरंगोटी, भित्तीचित्रे तसेच जुन्या प्रकल्पांचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे.

या मोहिमेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्वच्छ, सुंदर व हरित जिल्हा घडविण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता आणि सौंदर्यवर्धन करणे, घनकचरा व्यवस्थापन व प्लास्टिक कचरा निर्मूलनास चालना देणे, स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणे आणि या उपक्रमामध्ये लोकसहभाग वाढवणे हा या विशेष मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.

स्वच्छ आणि सुंदर शहर निर्मितीसाठी प्रशासन व नागरिकांचा समन्वय साधणे त्यामागील मुख्य हेतू आहे.

नगरपरिषद/नगरपंचायत निहाय स्वच्छता व सुशोभीकरण करण्यात येणाऱ्या ठिकाणांची नावे पुढीलप्रमाणे.

  • इस्‍लामपूर – I Love Uran Islampur Point, ताकारी रोड व राजेबागेश्वर मंदिर परिसर.
  • विटा – वेस्ट टू बेस्ट गार्डन यशवंत नगर, शिवसंगम मार्ग कारंजा व विवेकानंद नगर तलाव परिसर.
  • आष्टा – हुतात्मा स्मारक आष्टा, सव्वालाखी आष्टा व हिंदू स्मशान भूमी,आष्टा.
  • तासगांव – बस स्थानक परिसर, दत्त माळ कॉलेज कॉर्नर चौक व जागृती शिक्षण संस्था संचलित तासगाव प्राथमिक विद्यामंदिर तासगाव.
  • पलूस – हुतात्मा स्मारक पलूस, गावतळे पलूस व स्मशान भूमी पलूस.
  • जत – श्री क्षेत्र यल्लमा देवी मंदिर परिसर, श्री क्षेत्र अंबिका देवी मंदिर परिसर व उद्यान, मोरे कॉलनी.
  • कडेगांव – I Love Kadegaon Point, स्मशानभूमी कडेगाव ते कोतमाई ओढा लगतचा परिसर शिवाजीनगर रोड व Open Gym कडेगाव ते दत्तमंदिर.
  • कवठे महांकाळ – I Love Kavathe Mahankal point, युवावाणी चौक व नगरपंचायत नाट्यगृह शेजारी.
  • खानापूर – हुतात्मा स्मारक खानापूर, गोरेवाडी कॉर्नर व आम्ही खानापूरकर सेल्फी पॉइन्ट.
  • शिराळा – लक्ष्मी चौक, ग्लोकोज ऑफिस कॉर्नर व शिराळा बस स्थानक परिसर.
  • आटपाडी – तहसील समोरील गेट, जय भवानी नगर व ग्रामीण रुग्णालय जवळ.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button