सांगली | प्रतिनिधी

सांगली
: मंगळवार दि. ५ /११/२०२४ रोजी सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई गांजा विक्रीस आलेल्या दोन युवकास ताब्यात घेऊन त्यांच्याकब्जात असलेल्या २,५०,१०० रुपये किंमतीचा १० किलो गांजा आणि १ मोपेड चारचाकी १,००,००० रुपये किंमतीच्या अशा हा एकूण ३,५०,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. याबाबत संजयनगर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेले युवकांची नावे १) इनाममुलहसन बाबासाहेब शेख, वय २८ वर्षे, रा. राजीव गांधी कॉलनी, जुना कुपवाड रोड, सांगली २) अरमान मिरासाब शेख, वय २० वर्षे, रा. राजीव गांधी कॉलनी, जुना कुपवाड रोड, आहे तर फरार संशयित आरोपीचे नाव अरबाज उर्फ इप्तेखार बाबासाहेब शेख, रा. राजीव गांधी कॉलनी, जुना कुपवाड रोड, असे आहे.
पोलिसांच्या अधिक माहितीनुसार सध्या महाराष्ट्रात विधानसभा २०२४ ची निवडणुक आदर्श आचारसंहिता लागु झालेली असुन त्या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक, संदीप घुगे यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे विशेष पथक अंमली पदार्थ तस्करी, विक्री, वाटप ववितरण करणाऱ्यावर कारवाई करणेच आदेशीत केले.
त्या अनुषंगाने दि. ०५.११.२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक, नितीन सावंत यांचे पथकामधील पोलीस संकेत मगदुम,अमसिध्दा खोत, सतिश माने, अमोल ऐदाळे व अमसिध्दा खोत यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, एक इसम तयार गांजा विक्रीसाठी मोपेड गाडीघेऊन सांगली जुना कुपवाड रोड, दुधाळ कॉर्नर, सांगली येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली.
पोलिसांनी सापळा रचून दोन इसम संशयितरित्या राजीव गांधी कॉलनी येथून दुधाळ कॉर्नर कडे येताना दिसले. त्यांना थांबवून त्यांचे नाव गाव विचारपूस केली असता त्यानी त्यांची नावे इनाममुलहसन शेख, अरमान शेख असे सांगितले. पोलिसांनी त्यांची झाडाझडती केली असता, त्याचाकडे गांजा आढळून आला. सदर मालाची विचारपूस केली असता त्याचा भाऊ अरबाज उर्फ इप्तेखार बाबासाहेब शेख, रा. राजीव गांधी कॉलनी, जुना कुपवाड रोड, याने आणला असून तो माल विक्रीस आम्ही दोघे घेवुन चालल्याचे सांगितले.
पोलिसांनी त्या दोघांच्या कब्जातील १० किलो गांजा, मोपेड चारचाकी असा एकूण ३ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल सहा. पोलीस निरीक्षक, नितीन सावंत यांनी जप्त केला. पुढील तपास संजयनगर, पोलीस ठाणे करीत आहेत.