सांगली | प्रतिनिधी

सांगली : मंगळवार ता.५ भाजपने सांगलीत काँग्रेस फोडण्याचा पॅटर्न राबवला आहे. सांगलीत जे बंड चालू आहे ते काँग्रेसमधील बंडहे भाजपचे षड्यंत्र आहे. भाजपकडून गेल्या सहा महिन्यांपासून हे षड्यंत्र शिजवलं जात होतं.
याबाबत मला प्रदेश काँग्रेसचे प्रमुख नेत्यांनी सावध केलं होतं. आमदार विश्वजीत कदम यांनी खूप ताकदीने ते टाळण्याचा प्रयत्न केला, मात्र दुर्दैवाने ते टाळता आले नाही.पुढे बोलताना पृथ्वीराज पाटील म्हणाले, “आमदार विश्वजीत कदम यांनी मला मेरीटवर उमेदवारी दिली. जयश्रीवाहिनी यांना विधान परिषद द्यायची ठरले होते. तरीही त्यांनी बंडखोरी केली, या गोष्टीचे मला दुःख आहे. या बंडखोरीसाठी भाजपने नियोजन केले. राज्यात पक्ष फोडणाऱ्या भाजपने सांगलीतही तो पॅटर्न राबविला. त्यांचा हा डाव जनता हाणून पाडेल.
मला भाजपला पराभूत करायचे आहे. गाडगीळांना जनता कंटाळली आहे. पुढच्या पंधरा दिवसांत त्यांच्या निष्कलंक, स्वच्छ, कार्यसम्राटपणाचा बुरखा मी फाडणार आहे.
पृथ्वीराज पाटील
पृथ्वीराज पाटील म्हणाले, “वसंतदादा घराण्याने केलेले ही तिसरे बंड नाही. हा पार्ट थ्री नाही. त्यांचे हे चौथे बंड आहे. कारण, एकदा प्रकाशबापू पाटील यांच्या विरोधात मदनभाऊंनी बंड केले होते. ते का लपवता? सामान्य कार्यकर्ता लढायला उभा असताना पुन्हा त्याला पाडण्यासाठी बंड करताय? हे बंड मोडले तरच भविष्यात काँग्रेसमध्ये कार्यकर्ता मोठा होऊ शकेल.
महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आम आदमी पक्ष, शेकाप, समाजवादी पक्ष कार्यकर्त्यांची आज नियोजन बैठक कच्छी जैन भवनमध्ये झाली. त्यावेळी महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील म्हणत होते.