सांगली | प्रतिनिधी

सांगली : मंगळवार दि .५/११/२०२४ रोजी सांगलीतिल बंडखोर अपक्ष उमेदवार जयश्रीताई पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत भव्य प्रचाराचा शुभारंभ व जाहीर सभा आयोजन केले. जयश्रीवाहिनी सभेत बोलताना म्हणाले की इथे जमलेले गर्दी बघून असे वाटतंय की मी जो काल घेतलेला निर्णय योग्य आहे. जेव्हा जेव्हा दादा घरांण्यावर अन्याय झाला त्यावेळेस सांगलीचा जनतेने दादा घरणांना मदत केली आहे. गेली नऊ वर्ष मी काँग्रेसचे काम करते तसे मी पस्तीस वर्षांपासून भाऊ सोबत काँग्रेस चे काम केलंय पण त्यावेळी मदनभाऊ सक्रिय होते.
मी सुद्धा महिलांसाठी बचतगटासाठी बरेच कामे केली आहेत. महिलांना स्वतःचा पायावर उभे केले पण हे अत्ता काही लोके अशी म्हणतात की १० वर्ष आम्ही काँग्रेसची कामे केली खरे तर काँग्रेससाठी आंदोलने आम्ही केली पक्ष वाढवण्याचे काम आम्ही केले. मदनभाऊ गेल्या पस्तीस वर्षात एकदाच आमदार झाले. तरीपण ते आकरा आमदार घेऊन काँग्रेसमध्ये गेले. त्या काळात त्यांना फक्त आठच महिने संधी मिळाली त्या संधीचेही त्यांनी सोनं केले असे जयश्रीवाहिनी म्हणाल्या
माजी केंद्रीय मंत्री प्रतीकदादा पाटील यांनी काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराजबाबख पाटील यांच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले पृथ्वीराज पाटील इतके वर्ष कुठे होते, काँग्रेस पक्षासाठी संघर्ष आम्ही केला. आपले अस्तित्व निर्माण करावे लागते मग पद मिळते. पृथ्वीराज पाटलांनी काही केले नाही. जयश्री वहिनींची मदत घेतली मागची निवडणूक लढले आता स्वतःला मोठे म्हणू लागले.
‘तुमचा लोकसभेसारखा चंद्रहार पाटील होता कामा नये, याची काळजी घ्या’ पृथ्वीराजबाबांना सल्ला
प्रतीक पाटील
सांगलीत काँग्रेसने दिलेल्या उमेदवार हा भाजप पक्षाला हरवण्यास सक्षम नसल्याने आम्ही जयश्री वहिनींना उमेदवारी दिली. लोकसभेला जशी मला साथ दिली तशी जयश्री वहिनींना साथ द्या अशी इच्छा व्यक्त केली.
खा. विशाल पाटील