सांगली | प्रतिनिधी

सांगली : मनपा वतीने ५ नोव्हेंबर रंगभूमी दिन साजरा केलासांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृह आणि सांगली येथे दीनानाथ नाट्यगृह येथील रंगदेवताची नटराजाची पूजा करून रंगभूमी दिन सजरा करण्यात आला आहे.
राम कुलकर्णी मिरज तेथे तर सांगली मध्ये जगदीश सूर्यवंशी जेष्ठ कर्मचारी यांच्या हस्तेहस्ते श्रीफळ वाढवून रंगभूमी दिन साजरा करण्यात आला. मा. आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त विजया यादव यांच्या नियंत्रणा खाली मालमत्ता अधीक्षक व जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद यांच्या नियोजन नुसार कर्मचारी वर्गाच्या उपस्थितीमध्ये रंगभूमी दिन साजरा झाला.
या वेळी कर्मचारी प्रबुध कांबळे, नवीन बारिया, रंग नाट्य प्रेमी ओंकार शुक्ला, मुकेश भोकरे, धीरज पलसे, बाळ बरगाले, दिगंबर कुलकर्णी, विनायक इंगळे, प्रदीप शिंदे, कोमल सूर्यवंशी आदी अन्य नाट्यप्रेमी उपस्थित होते.