
बामणोली: ता.५ मंगळवार रोजी बामणोली गावामध्ये सांगली विधानसभा महायुतीचे भाजपा उमेदवार सुधीरदादा गाडगीळ यांनी बामणोली गावाची भेट घेऊन भैरवनाथाच्या आशीर्वाद व नारळ फोडून प्रचाराची सुरवात केली. सुधीरदादा गाडगीळ भैरवनाथ मंदिरात बोलताना म्हणाले की; येत्या २० तारखेला मला तुम्ही आशीर्वाद द्या, पुढील काळात मी मागणीमुक्त मतदारसंघ करतो अशी ग्वाही सुधीरदादांनी दिली.
भाजपा नेते संतोष सरगर बोलताना म्हणाले सुधीर दादा गाडगीळ यांनी बामणोली गावाला भरघोस निधी दिला आहे. आमदार फंड सोडून वैयक्तिक निधी ही बामणोली गावाला दिला आहे तर उपसरपंच विष्णू लवटे म्हणाले की सुधीर दादांनी गावासाठी भरमसाठ निधी दिला आहे. शासकीय कामात कोणतेही अडचन येऊ दिली नाही. दोन दिवसात होणारे काम दादांनी एका दिवसात करून दिलेली आहे तर पॅनेल प्रमुख सुभाष चिंचकर म्हणाले की मी गेले चाळीस वर्षे राजकारण करतोय सुधीरदादा एवढा निधी आजपर्यंत गावाला कधी मिळाला नाही व कोणी दिलाही नाही. बामणोलीकरांना एकच मागणे आहे की, बामणोलीचा विकास करणाऱ्या सुधीर दादांना मोठ्या मताधिक्याने विजयी करायचे आहे. बामणोली गावातूनही दादांना उस्फुर्त साथ मिळाला आहे.
बामणोली गावातून प्रचाराची सुरवात केली.
यावेळी बामणोली पॅनेल प्रमुख सुभाष (आण्णा) चिंचकर बामणोली सरपंच सौ. गीताताई चिंचकर, उपसरपंच विष्णू लवटे, माजी सरपंच विधमान सदस्य राजेश संनोळी, संतोष सरगर, किरण भोसले, सुमित यमगर, दिपक व्हॅनसुरे, बामणोली सर्व सदस्य आणि बामणोली नागरिक मोठया संख्येने उपस्थितीत होते.