सांगली | प्रतिनिधी

सांगली : विधानसभेसाठी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या जयश्रीताई पाटील यांनी केली बंडखोरी, विधानसभेला काँग्रेसने उमेदवारी पृथ्वीराज पाटील यांना दिली असताना ही जयश्रीताई पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून बंडखोर केल्याने जयश्री पाटील यांच्यावर काँग्रेस पक्षाकडून कारवाई करण्यात आली आहे. जयश्री पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे.
ज्या कांग्रेसच्या उमेदवारांनी बंडखोरी केलेल्या त्या उमेदवारांना 6 वर्षासाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी दिली आहे.
- रामटेक विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र मुळक
- याज्ञवल्क्य जिचकार
- पर्वती विधानसभा मतदारसंघातून आबा बागुल
- कसबा विधानसभा मतदारसंघातून कमल व्यवहारे
- सांगली विधानसभा मतदारसंघातुन जयश्री पाटील
असे हे निलंबित केलेले काँग्रेसचे पाच बंडखोर उमेदवार आहेत.
महाविकास आघाडीचा जाहीरनामा 10 नोव्हेंबरला जाहीर होणार असल्याचे सांगितले आहे. हा जाहीरनामा मुंबईत होणार असून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, संजय राऊत, जयंत पाटील, नाना पटोले यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध होणार असल्याचे समजते.