कुपवाड : प्रतिनिधी

कुपवाड : कृष्णा व्हॅली चेंबरच्या सभागृहात मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता सांगली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील मतदारांमध्ये जनजागृती करणेबाबत चेंबरमध्ये मीटिंग आयोजित करण्यात आलेली होती. सदर मीटिंगसाठी म.औ.वि. महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा जाधव सहा. कामगार आयुक्त एम. ए. मुजावर, कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू, सचिव गुंडू एरांडोले उपस्थित होते.
यावेळी बोलताना जाधव म्हणाल्या की, उद्योजकांनी आपआपल्या उद्योगातील कामगारांना निवडणुकीमध्ये १०० टक्के मतदान करण्यासाठी आवाहन करणे. तसेच प्रत्येकांनी आपल्या कंपनी मध्ये मतदान जनजागृतीचे बॅनर करून फोटो काढणे, सर्वांनी मतदानाचा टक्का कसा वाढेल यासाठी प्रयत्न करणे असे आवाहन केले. तसेच मतदानादिवशी कामगारांना शासनाने सुट्टी जाहीर केलेली आहे असेही त्यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे संचालक रमेश आरवाडे, हरिभाऊ गुरव, अरुण भगत, पांडुरंग रुपनर, मिरज असो. अतुल पाटील, उद्योजक सुरेश बिराजदार, सुयश फौड्री आर. डी. कुलकर्णी, बाश्को इंजि. पवन सगरे, जेसन फौंड्रीचे महेश कुलकर्णी, गॅलक्सी ट्रान्समिशनचे दत्तात्रय लोकरे, राज कास्टिंगचे रियाज कमिरकर, एक्सेला पेन्सिलचे सावंता माळी संस्थेचे व्यवस्थापक अमोल पाटील, मिरज असो. व्यवस्थापक गणेश निकम यासह कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील परिसरातील अनेक उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.