देशातील पहिली ‘डिजिटल जनगणना’; सांगली महापालिका सज्ज

सांगली | प्रतिनिधी १२ एप्रिल २०२६ : आगामी ‘जनगणना २०२७’ साठी सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. यंदाची जनगणना ही देशातील पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना असणार असून, त्यासाठी फील्ड ट्रेनर्सचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण झाले आहे.

🚀 यंदाची जनगणना का आहे खासमोबाईल

🔺 ॲपचा वापर: प्रगणक आता कागद-पेन ऐवजी थेट मोबाईल ॲपद्वारे माहिती नोंदवतील.

🔺स्वगणनेची सुविधा (Self-Enumeration): १ ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिक स्वतःची माहिती ऑनलाईन पोर्टलवर भरू शकतील.

🔺अचूकता आणि वेग: डिजिटल माध्यमामुळे ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, जलद आणि सुरक्षित होणार आहे.

🔺प्रशिक्षण: उपायुक्त अश्विनी पाटील यांच्या उपस्थितीत फील्ड ट्रेनर्सना मोबाईल ॲप, ३४ प्रश्नांची प्रश्नावली आणि CMMS पोर्टलचे तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले.

📅 महत्वाच्या तारखा लक्षात ठेवा:

🔺१. १ मे ते १५ मे २०२६: ऑनलाईन स्वगणना (Self-Enumeration) प्रक्रिया.

🔺२. १६ मे ते १४ जून २०२६: प्रगणकांकडून घरोघरी जाऊन माहिती संकलन.

“डिजिटल माध्यमामुळे जनगणनेचे काम अधिक अचूक आणि पारदर्शक होईल. सांगली महापालिकेने यासाठी सर्व तांत्रिक तयारी पूर्ण केली आहे.”— अश्विनी पाटील, उपायुक्त, सांगली महापालिका

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button