गरिबांसाठी सक्षम आरोग्य व्यवस्था उभारण्यावर शासनाचा भर – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मिरज (प्रतिनिधी) १४ एप्रिल २०२६  : “सामान्य नागरिकांना खासगी रुग्णालयांचा महागडा खर्च परवडत नाही. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना त्यांच्याच जिल्ह्यात दर्जेदार आणि मोफत उपचार मिळावेत, ही शासनाची प्राथमिकता आहे. राजयातील शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय सेवा बळकट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. मिरज येथील शासकीय रुग्णालयात ‘मॉड्युलर आय.सी.यु.’ चे लोकार्पण आणि सांगलीतील पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील ‘मॉड्युलर ऑपरेशन थिएटर’ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

सांगली-मिरज रुग्णालयांसाठी मोठ्या घोषणा आणि निधीकार्यक्रमादरम्यान मंत्री महोदयांनी रुग्णालयातील आधुनिक सुविधांची माहिती दिली:सांगली सिव्हिल हॉस्पिटल: राज्य शासनाच्या २० कोटी रुपयांच्या निधीतून ७ पैकी ५ मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचे लोकार्पण करण्यात आले.मिरज सिव्हिल हॉस्पिटल: ४० बेडचा अत्याधुनिक मॉड्युलर आय.सी.यु. तयार करण्यात आला आहे.

आधुनिक यंत्रसामग्री:राज्यात

पहिली डिजिटल ब्रेन एन्जिओग्राफी मशीन मिरजमध्ये सुरू झाली आहे. तसेच ३ टेस्ला एमआरआय मशीनचा लाभ आतापर्यंत १५ हजारांहून अधिक रुग्णांनी घेतला आहे.विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधांचे विस्तारवैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुश्रीफ यांनी अनेक कामांचे भूमिपूजन केले.

१. लेक्चर हॉल व वसतिगृह: २५० विद्यार्थी क्षमतेचे चार नवीन लेक्चर हॉल आणि प्रॅक्टिकल हॉलची उभारणी.

२. नर्सिंग कॉलेज: १०० विद्यार्थी क्षमतेचे नवीन बी.एस्सी नर्सिंग कॉलेज मंजूर झाले असून त्याचे बांधकाम लवकरच सुरू होईल.

३. पायाभूत सुविधा: सांगली आणि मिरज रुग्णालयातील सांडपाणी व्यवस्थापनासाठी (STP Plant) २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

भविष्यातील नियोजन:कॅन्सर

उपचार आणि रोबोटिक सर्जरीमंत्री मुश्रीफ यांनी भविष्यातील योजनांबाबत बोलताना सांगितले की, मिरज येथे कॅन्सर उपचारांसाठी ‘L3’ स्तराची सुविधा विकसित केली जाईल, जिथे केमोथेरपी आणि रेडिएशन सेवा उपलब्ध होतील. तसेच सांगली-मिरज रुग्णालयात ‘रोबोटिक सर्जरी’ सुविधा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, पीपीपी तत्त्वावर कॅथलॅब उभारून बायपास शस्त्रक्रियाही येथेच केल्या जातील.या

कार्यक्रमास आमदार सुधीर गाडगीळ, आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, उपअधिष्ठाता डॉ. श्रीकांत अहंकारी, आणि वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. रूपेश शिंदे यांच्यासह डॉक्टर्स, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी, मंत्री हसन मुश्रीफ यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button