
सांगली | प्रतिनिधी १० एप्रिल २०२६ : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेतील रिक्त असलेल्या ८ स्वीकृत नगरसेवक पदांसाठी आज अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत संपली. या जागांसाठी सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंच्या इच्छुकांनी मोठी गर्दी केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
महानगरपालिकेतील सध्याच्या पक्षीय संख्याबळानुसार, ८ जागांचा कोटा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आला आहे.
भारतीय जनता पक्ष (भाजप): ४ जागाकाँग्रेस: २ जागाराष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): २
जागा कोणाचे अर्ज कोणाकडे?
१. भाजपमध्ये चुरसभाजपच्या
वाट्याला सर्वाधिक ४ जागा असल्याने इच्छुकांची संख्याही मोठी आहे. गटनेते संदीप आवटी यांच्याकडे प्रामुख्याने खालील नावांचे अर्ज सादर झाले आहेत:हनुमंत पवार केदार खाडिलकर विनायक माईनकर कयुम पटवेगार
२. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)राष्ट्रवादीकडून
मैनुद्दीन बागवान यांच्याकडे प्रमुख इच्छुकांनी आपली दावेदारी मांडली आहे. यामध्ये महिला आणि अनुभवी कार्यकर्त्यांचा समावेश आहे:आयशा इद्रीस नाईकवाडी स्नेहल सावंत शिशिर जाधव अशोक मासाळे
३. काँग्रेस पक्षाची भूमिका
काँग्रेसच्या वाट्याला २ जागा असून, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्याकडे इच्छुकांनी अर्ज सोपवले आहेत. यात प्रामुख्याने खालील नावांची चर्चा आहे दीपक माने, सुरज कांबळे
विशेष म्हणजे केवळ राजकीय पक्षांचेच कार्यकर्ते नव्हे, तर काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही स्वतंत्रपणे आपले अर्ज दाखल केले आहेत. यामुळे अर्जांची एकूण संख्या वाढली असून, आता पक्षश्रेष्ठी नेमकी कोणाच्या गळ्यात विजयाची माळ घालतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.येत्या काही दिवसांत अर्जांची छाननी होऊन अंतिम नावे जाहीर केली जातील. स्वीकृत पदासाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळणार की नव्या चेहऱ्यांना प्राधान्य दिले जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.