मिशन लक्ष्यवेध: सांगलीतील गुणवंत खेळाडूंना सुवर्णसंधी; ९ एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

५ क्रीडा प्रकारात प्रत्येकी २० खेळाडूंची होणार निवड; प्रशिक्षणासह सर्व खर्च शासन करणार

सांगली, दि. ३१ :महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन लक्ष्यवेध’ योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यातील खेळाडूंसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या योजनेतून जिल्ह्यात स्थापन होणाऱ्या ‘क्रीडा प्रतिभा विकास केंद्रा’साठी ५ विविध खेळांतील प्रत्येकी २० खेळाडूंची निवड केली जाणार आहे. पात्र खेळाडूंनी ९ एप्रिल २०२६ पर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी केले आहे.

१. रोइंग (Rowing)२. लॉन टेनिस (Lawn Tennis)३. मैदानी खेळ (Athletics)४. बॅडमिंटन (Badminton)५. वेटलिफ्टिंग (Weightlifting)मिशन लक्ष्यवेध काय आहे? या ५ खेळांसाठी होणार निवड. ऑलिम्पिक स्तरावर खेळल्या जाणाऱ्या १२ खेळांवर लक्ष केंद्रित करून महाराष्ट्रातून जागतिक दर्जाचे खेळाडू घडवणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.

ही योजना त्रिस्तरीय असून त्यात ‘हाय परफॉमन्स सेंटर’ (राज्यस्तर), ‘स्पोर्ट एक्सलन्स सेंटर’ (विभागीय स्तर) आणि ‘क्रीडा प्रतिभा विकास केंद्र’ (जिल्हा स्तर) यांचा समावेश आहे. निवड झालेल्या खेळाडूंना प्रगत प्रशिक्षण, पूरक आहार, गणवेश, क्रीडा साहित्य, स्पर्धा प्रवास खर्च आणि विम्याची सुविधा शासनाकडून मोफत पुरवली जाईल.

खेळाडूंसाठी पात्रतेचे निकष:वय:

३१ डिसेंबर २०२६ रोजी खेळाडूचे वय २१ वर्षांच्या आत असावे. रहिवासी: खेळाडू महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. गेल्या २ वर्षात राज्यस्तरावरील सहभाग किंवा पदक प्राप्त खेळाडू (शालेय किंवा अधिकृत संघटना स्पर्धा) असणे आवश्यक आहे. निवड प्रक्रिया: ही प्रक्रिया अनिवासी स्वरूपाची असून तज्ज्ञ समितीद्वारे कौशल्य व तंदुरुस्ती चाचणी घेतली जाईल.

आवश्यक कागदपत्रे:

जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (LC).अधिकृत डॉक्टरांचे मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र.अधिवास प्रमाणपत्र (Domicile) आणि आधार कार्ड. गेल्या २ वर्षांतील क्रीडा कामगिरीची प्रमाणपत्रे.३ पासपोर्ट साईज फोटो, बोनाफाईड प्रमाणपत्र आणि पालकांचे संमतीपत्र.

अर्ज कोठे व कसे करावेत?

खेळाडूंनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह dsosport_sangli@rediffmail.com या ईमेल आयडीवर पाठवावेत किंवा प्रत्यक्ष जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली येथे दि. ९ एप्रिल २०२६ पर्यंत सादर करावेत. अधिक माहितीसाठी निवड चाचणी समिती प्रमुख क्रीडा कार्यकारी अधिकारी नरेश सावंत (मो. ९६०४८१३८८१) यांच्याशी संपर्क साधता येईल.

जास्तीत जास्त खेळाडूंनी या संधीचा लाभ घेऊन सांगली जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button