मिरजेत कॉफी शॉपवर पडलेल्या दरोड्याचा छडा; तिघे जेरबंद, ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त

मिरज ता.३० : छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील एका कॉफी शॉपमध्ये धारदार शस्त्रांचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा मिरज शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींसह एका बालअपचाऱ्याला ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून कोयते, दुचाकी आणि रोख रक्कम असा एकूण ६१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरजेतील गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील एका कॉफी शॉपमध्ये ही घटना घडली होती. आरोपींनी कॉफी शॉपमध्ये घुसून धारदार शस्त्रांचा (कोयत्यांचा) धाक दाखवत दहशत निर्माण केली आणि जबरी चोरी केली होती. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासाचे आदेश दिले. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचला. अवघ्या काही तासांत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले, तर तिसरा आरोपी दोन दिवसांनंतर पोलिसांच्या जाळ्यात. अडकला. या कारवाईत पोलिसांनी संशयित ओंकार साळुंखे, आकाश फोंडे, सौरभ पोतदार एक बालअपचारी आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ४ धारदार कोयते गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल रोख रक्कम(एकूण किंमत: ६१,९०० रुपये) मुद्देमाल करण्यात आला. पोलिसांच्या कामगिरीचे कौतुकगुन्हा घडल्यानंतर अत्यंत कमी वेळात आरोपींना जेरबंद केल्यामुळे मिरज पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. भरवस्तीत झालेल्या या चोरीच्या प्रकाराचा छडा लागल्याने व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मिरज शहर पोलीस करत आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button