जुन्या वादातून तरुणाचा भररस्त्यात निघृण हत्या 

सांगली, प्रतिनिधी, ता. ३० : सांगली शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, संजयनगर परिसरात जुन्या वैमनस्यातून एका तरुणाची भररस्त्यात निघृण हत्या करण्यात आली आहे. सौरभ महादेव पवार (वय अंदाजे २२-२५) असे मृत तरुणाचे नाव असून, तो पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ पवार हा आपल्या एका मित्रासह दुचाकीवरून महापालिकेच्या गाळ्याजवळ आला होता. यावेळी तिथे आधीच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला. संशयित आरोपी शाहीद मुल्ला आणि आयन बिस्ती यांनी धारदार शस्त्राने थेट सौरभच्या गळ्यावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या सौरभने आपला जीव वाचवण्यासाठी रक्ताच्या थारोळ्यात धावण्याचा प्रयत्न केला. मात्र, निर्दयी हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करून पुन्हा वार केले. भररस्त्यात झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात नागरिकांची पळापळ झाली. सौरभला तातडीने सांगलीतील शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल केले. मात्र, अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. प्राथमिक अंदाज तपासात ही हत्या जुन्या वादातून आणि वैमनस्यातून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. काही दिवसांपूर्वी सौरभ आणि संशयित आरोपींमध्ये  भांडण झाले होते.  विशेष म्हणजे, मृत सौरभ आणि संशयित आरोपी या दोघांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे समजते.घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्परता दाखवत एका संशयिताला ताब्यात घेतले असून, दुसऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. संजयनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, अधिक तपास पोलीस करत आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button