
मिरज:कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी महाराष्ट्र बरोबर कर्नाटक राज्याचे रस्ते करणारे राज्यातील एकमेव आमदार अशी त्यांची ओळख होऊ लागली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागावर असणारे जानराववाडी ते विष्णूवाडी रस्ता,सलगरे ते शिरूर रस्ता, सलगरे ते अरळ हट्टी रस्ता, सलगरे ते बुमनाळ रस्ता या रस्त्यासाठी तब्बल कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नाने 18 कोटीचा निधी उपलब्ध दिला.
कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्याकडून आज कर्नाटक सीमा भागालगत असणाऱ्या गावांचा भागांचा विकास केला. त्यासाठी रस्त्यांसाठी 18 कोटीचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कर्नाटकातील माजी जिल्हा परिषद सदस्य विनायक बागडी अशोक सूर्यवंशी, उदय पवार, शिव मगदूम, विनायक निकम, परशुराम राजमाने, तानाजी शिंदे, केदारी नागराळे, मंजुनाथ पाटील, पुंडलिक मुदडे, रामदास माने, कुमार पोतदार यांनी भाऊंचा आज जंगी सत्कार त्यांच्या कार्यामध्ये करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्यातील एकमेव मंत्री ज्यांनी महाराष्ट्र बरोबर कर्नाटक राज्याच्या विकासासाठी लढणारा एकमेव नेता असून पुन्हा त्यांना मिरज विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडून देऊन देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी व भारतीय जनता पार्टीचे हात बळकट करण्यासाठी अबकी बार सुरेश भाऊ असे म्हणत त्यांनी सुरेश भाऊ यांचा मोठा सत्कार करण्यात आला आहे.
मिरज मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे केलेली आहेत. सीमा भागावरती असणारे खटाव, सलगरे, जानराववाडी हा रस्ता डांबरीकरण करण्यात आला आहे. सीमा भागावरती असणाऱ्या लोकांसाठी कर्नाटक राज्यात जाणाऱ्या रस्ता हा डांबरीकरण नसल्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना येण्या-जाण्यासाठी खूप मोठा त्रास सहन करावा लागत होता. यासाठी नामदार सुरेश भाऊ खाडे यांनी महाराष्ट्रातील रस्त्याबरोबरच कर्नाटक राज्यातील रस्त्यांसाठी पाठपुरावा करून तब्बल 18 कोटी निधीचा उपलब्ध करून दिल्यामुळे मिरज येथील कार्यालयामध्ये त्यांचा भव्य जंगी सत्कार करण्यात आला.