
सांगलीतील चिंतामण नगर येथील 14 वर्षे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा देण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नानासाहेब वाघमारे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे.
बदलापूर मध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराचे घटना ताजी असताना देखील आज सांगली येथील चिंतामण नगर मध्ये 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे.
या प्रकरणातील रेकॉर्डवरील गुन्हेगार असणारा आरोपी संजय प्रकाश माने यांना फाशी शिक्षा द्यावी व यासाठी प्रकरण फास्टट्रॅकवर चालवावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून करण्यात आले आहे. अल्पवयीन मुलीवर होत असलेल्या अत्याचाराबाबत संपूर्ण महाराष्ट्रावर नामदार रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर निदर्शने केली जाणार आहे.
यावेळी छायाताई सरवदे जिल्हाध्यक्ष महिला आघाडी, विशाल उर्फ लालासाहेब वाघमारे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, नानासाहेब वाघमारे, बापूसाहेब सोनवणे, महेश शिंदे, शशिकांत कांबळे, सागर आवळे, राहुल जाधव, सचिन मोरे, विजय आवळे, अंकुश आवळे, महेश शिंदे व इतर बहुसंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.