कुपवाड परिसरात येणाऱ्या सर्व गणेशमंडळांनी गणेशोत्सव शासनाच्या नियमांचे पालन करून साजरा करावा.

कुपवाडातील सर्व गणेशमंडळांनी गणेशोत्सव ‘दणदणाटमुक्त व पर्यावरणपूरक’ साजरा करण्याचे आवाहन कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक दिपक भांडवलकर यांनी केले.
सर्व मंडळांना सीसीटीव्ही कॅमेरे हे बंधनकारक, उत्सवात कोणत्याही जाती धर्मात तेढ निर्माण किंवा सामाजिक सलोखा बिघडू नये याची खबरदारी घ्यावी.

पोलीस प्रसाशनाचे नियमांचे काटेकोरपणे पालन करून जे गणेशमंडळ गणेशोउस्तव साजरा करतील, अशा आदर्श गणेशमंडळांना ‘विशेष सन्मानपत्र’ देऊन गौरविण्यात येईल.
गणेशोत्सवात गणेशमंडळांकडून सामाजिक उपक्रम राबविण्यात यावे.यामध्ये रक्तदान शिबिर, महिला सक्षमीकरण असे अनेक विविध सामाजिक उपक्रमे घेण्याचे आवाहन केले.
पोस्टर फलकातून गुन्हेगारीचे प्रसारण होणार नाही याची खबरदारी घ्यावी. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर रित्या कारवाई केली जाणार आहे.