
खटाव तालुका मिरज येथील सध्या कार्यरत असलेले ग्रामसेवक राजकीय यंत्रणा वापरून खटाव गावात सुरू असलेल्या कामांबाबत पुराव्यानिशी भांडेफोड करणार प्रहार जनशक्ती पक्षाचे उपाध्यक्ष परशुराम बनसोडे पुराव्यानिशी जनतेसमोर मांडणार आहे.
गेल्या तीन-चार वर्षांपासून खटाव ग्रामपंचायतीचे मनमानी कारभार सुरू असून ग्रामविकास अधिकारी यांनी गावात सुरू असलेल्या कामात स्वतःच ठेकेदार म्हणून काम करत आहेत याची माहिती उद्या संपूर्ण माहिती जनतेसमोर मांडणार आहेत.
खटाव गावातील जनता ही सुज्ञ आहे. स्वतःच्या फायद्यासाठी शासकीय यंत्राचा वापर करून स्वतः ठेकेदार म्हणून काम करत असलेले पुरावे ग्रामसभेमध्ये देणार आहे.
अशा ग्रामसेवकाची तातडीने हकालपट्टी करून त्यांच्यावर निलंबनाचे कारवाई करण्याची मागणी जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे उद्या करणार आहे.
खटागावातील कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन जो काही उद्योग त्यांनी सुरू केला आहे ते त्यांनी तातडीने थांबवावी. खटाव गावातील जल जीवन मिशन घनकचरा व्यवस्थापन ग्रामपंचायत येथे सुरू असलेल्या फर्निचर कामांमध्ये मोठा प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. खटाव गावातील ग्रामविकास अधिकारी स्वतः काम करत असतील तर गावातील ठेकेदार कोणत्या ठिकाणी काम घेणार याचे उत्तर देखील उद्या ग्रामसभेत ग्रामसेवकांनी द्यावे, असे आव्हान परशुराम बनसोडे यांनी केले आहे.
सोमवार दिनांक 26 8 2024 रोजी सकाळी 1 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यातील व मिरज तालुक्यातील सर्व पत्रकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे. खटाव गावात ग्रामपंचायतमध्ये चाललेल्या भ्रष्ट कारभाराविषयी ग्रामसेवक करत असलेल्या कामाबाबत ठोसपुरावे पत्रकार परिषदेमध्ये सादर करण्यात येणार आहे.