
कुपवाड : किरकोळ कारणावरून युवकावर कोयत्याने हल्ला चढवल्याची घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. हल्लेखोर गणेश खोत व सुजित माने ( दोघेही रा. शांतकॉलनी, कुपवाड ) आसून यांनी साहिल गौस शेख ( रा. शांतकॉलनी, कुपवाड ) या युवकावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला.
या घटनेची माहिती मिळवत कुपवाड पोलिसांनी अवघ्या दोन तासातच हल्लेखोरांना पकडले. या हल्ल्यात जखमी शेख यावर पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णयलयात दाखल केले. सदर घटनेचा अधिक तपास कुपवाड पोलिस करत आहेत.
या घडलेले घटनेतून कुपवाड परिसरात खळबळ उडाली.