कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील चाकण सबस्टेशन होणार;उर्जमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सबस्टेशनला मंजुरी

कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील चाकण सबस्टेशन होणार आता १० मेगा व्होल्ट अँम्पिअरचे..

मुंबई येथे आयोजित केलेल्या उद्योजकांच्या बैठकीत समस्या मांडताना कृष्णा व्हॅली चेंबरचे संचालक रमेश आरवाडे.

उद्योजकांच्या बैठकीत उर्जमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सबस्टेशनला तत्वता मंजुरी.

कुपवाड : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे औद्योगिक वसाहतीमधील असणाऱ्या उद्योजकाच्या समस्येबाबत मिटिंग बोलावली होती. सदर बैठकीस कृष्णा व्हॅली चेंबरचे माजी उपाध्यक्ष विद्यमान संचालक रमेश आरवाडे उपस्थित होते.
सदर बैठकीमध्ये कुपवाड बोलताना आरवाडे म्हणाले की, कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये विजेअभावी जुन्या उद्योजकांना आपला व्यवसाय वाढविणे कठीण झालेले आहे, तसेच जे नवीन उद्योजक आहेत त्यांना विजे अभावी आपला व्यवसाय सुरु करता येत नाही.

सदर विषयावर बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली व पूर्वी चाकण सबस्टेशनमधून ५ एमव्हीए एवढा पुरवठा होत होता. आता ५ एमव्हीएच्या ऐवजी आता तेथे १० एमव्हीए ३३/११ केव्हीचे सबस्टेशन होणार् आहे. सदर सबस्टेशन कामासाठी १६७.९५ लाख एवढा निधी उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आला आहे. सदरच्या वाढीव सबस्टेशनला जी मंजुरी दिली आहे त्याबद्दल औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
तसेच कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये प्रस्तावित ३३/ ११ केव्ही चे सबस्टेशन येत्या २ महिन्यात कार्यान्वित होईल असे त्यांनी सांगितले. सदरचे सबस्टेशन २ महिन्याच्या आत करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले. सदरचे ३३/ ११ केव्ही चे सबस्टेशन झाले तर आजूबाजूच्या परिसरातील उद्योजकांना विजेचा जास्तीत जास्त पुरवठा होईल व विजे अभावी जे उद्योग रखडलेले आहेत त्यांचाही प्रश्न मार्गी लागेल.

सदरच्या सबस्टेशन काम मार्गी लावण्यात महावितरणचे अधिक्षक अभियंता धर्मराज पेठकर, कार्यकारी अभियंता आप्पासाहेब खांडेकर, तसेच प्रदीप वाकोडकर यांचे मोलाचे योगदान लाभले त्याबाबत त्यांचेही आभार.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button