
कुपवाड : दि.23 सायंकाळी कुपवाड औधोगिक वसाहतीतील पोलिस ठाण्याचा नजीकच रोडवर आपघात झाला. या अपघातात क्रेनने पायी चालत जाणाऱ्यामहिलेला धडक दिली या धडकेत महिला गंबीर जखमी झाली. घटनास्थळी पोलीसांनी धाव घेऊन या घटनेतील जखमी महिलेस रुग्णवाहिकाद्वारे उपचारासाठी रुग्णालय दाखल केले. धडक देणारी क्रेन व क्रेनचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार सदर महिला औद्योगिक वसाहतीतील पोलिस ठाण्याचेसमोरील नजीकच्या रोडवरून शुक्रवारी सायंकाळी पायी जात असताना क्रेन चालकाने महिलेला धडक दिली या धडकेत सदर महिलेला गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर महिलेस रुग्णालयात दाखल करण्यात आले. धडकेतील क्रेन व क्रेनकचालकास कुपवाड पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत त्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.