
कुपवाड : शुक्रवार दि 23 रोजी कुपवडलामधील समजबांधवानी नाशिक येथे रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असल्याने त्या गोष्टीचा निषेध केला. रामगिरी महाराजांच्या यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी कुपवाड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिपक भांडवलकर यांच्याकडे निवेदनद्वारे करण्यात आली. त्याचबरोबर बदलापूर आणि कोल्हापूर येथील घटनेचा निषेधही व्यक्त या निवेदनमध्ये करण्यात आला.
यावेळी कुपवाडच्या दर्गा सरपंच आयनुद्दीन मुजावर, असिफ मुजावर, राजू मुजावर, सायबुद्दीन मुजावर, नासिर मसलत, युनूस महात, नासर मुजावर, मुद्दसर मुजावर, मुन्ना शेख, मुनिर मुल्ला, कासम मुजावर, इनमूलहसन मुल्ला, झाकीर मुजावर, सनी धोतरे, दादासाहेब कोळेकर आदि समाजबांधव उपस्थित होते.