
सांगली: आज ता.23 शुक्रवार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सांगलीचे उपशहर प्रमुख राम काळे यांनी लक्ष्मी मंदिर ते वसंतदादा कुस्ती केंद्र जे रस्त्याचे काम चालू आहे ते रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे.या गोष्टीवर आवाज उठवला.
या रस्ताच्या कामात दगडी मुरूमाचा वापर न करता पूर्णपणे मातकट मातीचा मुरूम वापरला जात आहे . सदर रस्त्याच्या कामाबाबत रस्त्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना शाखा अभियंता क्षीरसागर साहेब कार्यकारी अभियंता नलवडे साहेब यांना वेळोवेळी माहिती देऊन ते सदर कामास दुर्लक्ष करीत आहेत .
आज परत या कामाबाबत पाहणी केली असता रस्तावर मुरमा एवजी लाल माती टाकून काम सुरू होते . मी सदर रस्ताच्या व्हिडिओ करत आहे हे त्यांच्या निर्दनास आल्यावर या कामाचा चुकारपणा झाकण्यासाठी त्या रस्त्यावरती वरती खडी टाकण्यात अली.
सदर कामाबाबत संबंधित अधिकारी यां कामात लक्ष घालून हे काम चांगल्या पद्धतीने व उत्तम दर्जेचे करावे अशी मागणी करीत आहे.