ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने; मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरला फासलं काळं

मिरज शहरात मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरला फासलं काळं, ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने.


मिरज : रत्नागिरी येथे मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्यासाठी सांगली डेपोतल्या बसेस मोठ्या प्रमाणात रवाना करण्यात आले आहेत. यागोष्टीवरून आक्षेप घेत ठाकरे गट शिवसैनिकांकडून मिरज बस स्थानकामध्ये ठिय्या मारत आंदोलन करण्यात आले.

तसेच यावेळी बस आगरातील बसेस वर लावण्यात आलेल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या पोस्टरला काळे देखील फासण्यात आले. यावरून शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी प्रकार घडला.पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

रत्नागिरी येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या लाडके बहीण मेळाव्यासाठी मिरज आणि सांगली एसटी डेपोतील बसेस मोठ्या प्रमाणात रवाना करण्यात आल्या आहेत. असा आरोप करत शिवसैनिक ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं होतं.

रत्नागिरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी सातारा जिल्ह्यातून एसटी बस रत्नागिरीला मागविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व डेपो मधून 144 बसेस रत्नागिरीला पाठविण्यात आल्या आहेत. परिणामी साताऱ्यातील एसटी बसेस वेळापत्रक कोलमडलं आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाने त्याविरोधात आज मिरजेत आंदोलन केले..

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button