संकटग्रस्त बालकांना मदत करण्यासाठी टोल फ्री नंबर 1098 वर कॉल करा-महिला व बाल विकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे

येता संकट बालकावरी 1098 मदत करी

टोल फ्री क्रमांक 1098 वर कॉल करून संकटग्रस्त बालकांना मदत करा असे आवाहन महिला व बाल विकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.

सांगली : आपल्या आजूबाजूला आपल्याला जर बालकामगार, बाल भिक्षेकरी, लैंगिक अत्याचार ग्रस्त बालके, हरवलेली बालके तसेच सापडलेली बालके, मदतीची आवश्यकता असलेली संकटग्रस्त बालके आढळल्यास अशा बालकांना त्वरित आवश्यक मदत कोठून व कशी मिळवून देता येईल, या करिता कोठे संपर्क करावा या बाबत सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम असतो.

अशा संकटग्रस्त बालकांना त्वरित मदतीकरिता भारत सरकार, महिला व बाल विकास विभाग नवी दिल्ली व महाराष्ट्र शासन, महिला व बाल विकास विभाग यांच्या मार्फत 0 ते 18 वयोगटातील कोणत्याही प्रकारच्या अडचणीत/संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या सर्व बालकांसाठी चाईल्ड हेल्प लाईन सेवा 1098 संपूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित आहे.

या सेवेअंतर्गत संकटग्रस्त बालकांना 24×7 हेल्पलाईन सेवा उपलब्ध आहे. या सेवेचा लाभ बालक स्वतः घेवू शकतो किंवा इतर कोणीही या सेवेद्वारे बालकाला मदत मिळवून देऊ शकतात. 1098 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून संकटग्रस्त बालकांना मदत करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button