
सांगली : आता रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी ‘खड्डे तक्रार’ निवारण प्रणाली (PCRS) विकसित करण्यात आले आहे .
सार्वजनिक बांधकाम विभागाने 1 लाख 18 हजार कि.मी. पेक्षा जास्त रस्त्यांचे जाळे तयार केले आहे. या विभागामार्फत राज्यातील प्रमुख राज्य महामार्ग (MSH), राज्य महामार्ग (SH) व प्रमुख जिल्हा रस्ते (MDR) या तीन प्रकारच्या रस्त्यांची नियमित देखभाल आणि दुरुस्ती केली जाते. सर्वसाधारणपणे पावसाळ्यानंतर रस्त्यांवर खड्डे पडतात.
त्यामुळे विभागाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारींचे निराकरण करून नागरिकांमध्ये विभागाची प्रतिमा उंचाविण्यासाठी खड्डे तक्रार निवारण प्रणाली (PCRS) विकसित करण्यात आली आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
PCRS हे अँड्रॉइड ॲप सर्व नागरिकांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील खड्ड्यांसंबंधीच्या तक्रारी नोंदवण्याची सुविधा देईल. PCRS ॲप
http://mahapwd.gov.in/PMIS/PWPCRS_CITIZEN.apk
या लिंकचा वापर करून PWD वेबसाईटवरून आणि
https://apps.mgov.gov.in/details?appid=1847
या डाउनलोड लिंकसह भारत सरकारच्या mSEVA ॲप स्टोअरवरून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.
तसेच Google Play store वर https://play.google.com/store/apps/details?id=com.cdac.pwd.citizen&hl=en-IN
या लिंकसह कोणत्याही अंड्रॉईड मोबाईल मध्ये स्थापित करता येईल.