
कोल्हापूर : कोलकाता, बदलापूर घटना ताजी असतानाच आता कोल्हापुरातही राक्षशी कृत्य ; दहा वर्षीय चिमुरडीची अत्याचार करून हत्या करणात आली. कोल्हापुरातील शिये गावातील रामनगर परिसरामध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेत कोल्हापूर पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतलं आहे.
कोल्हापुरातील शिये येथे एका १० वर्षीय मुलीचा मृतदेह उसाच्या शेतात आढळून आला.तिच्यावर लैंगिक अत्त्याचार करून तिची हत्या केल्याचा संशय आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. शिये रामनगर येथून एका परप्रांतीय कुटूंबातील १० वर्षीय मुलगी बुधवारी दुपारपासून घरातून बेपत्ता झाली होती. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊनही तिचा काहीच पत्ता न लागल्याने याबाबत शिरोली पोलिसात तक्रार दाखल केली होती.
शिये येथील ही १० वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून केलेल्या हत्येच्या घटना समोर आली या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली . ही घटना कळताच जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचि पाहणी केली.
महाराष्ट्रात ना महिला सुरक्षित,ना मुली सुरक्षित आहेत…. दररोज महिला व मुलीवरील लैंगिक अत्याचार हा वाढत चालली आहेत…. सरकारने नुसते समीती नेमून न्याय मिळणार का…..महाराष्ट्रातील महीला व मुलीवर वांरवार होणारे अत्याचार होऊ नयेत याकडे सरकारने गांभीर्याने निर्णय घेणे गरजेचे आहे.