
मालगाव ग्राम विकास अधिकारी सुरेश जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई करा अन्यथा सर्व पक्ष संघटना व पुरोगामी संघटना तसेच आंबेडकरी समाजाच्या वतीने मिरज पंचायत समिती कार्यालयावर गुरुवारी भव्य मोर्चा काढणार.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी आंबेडकरी समाजाला फसवले आहे.आज मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर करून बुधवारपर्यंत मालगाव ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप कारवाई करा अन्यथा गुरुवारपासून भव्य मोर्चा करण्याचा इशारा पुरोगामी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे गेल्या सात दिवसापासून मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर यांनी आमरण उपोषण करत आहेत.
त्यांच्याकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप महेश कुमार कांबळे यांनी केला आहे. जिल्हा प्रशासनाने आंबेडकर समाजाचे अंत पाहुनेजिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी पंधरा दिवसात मालगावचे ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मालवाच्या ग्रामविकास अधिकारी यांची चौकशी होऊन दोषी असूनही कारवाई करण्यात विलंब होत आहे. जिल्हा प्रशासनाने दबावला बळी न पडता कारवाईचे आदेश द्यावेत अशी मागणी पुरोगामी संघटना कडून करण्यात आले आहे.उपोषणकर्तेत उपसरपंच तुषार खांडेकर यांना जीविकास धोका निर्माण झाल्यास जिल्हा परिषद प्रशासन जबाबदारी याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीच्या गैरहजर राहणाऱ्या सुरेश जगताप यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे सांगली जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करावी. अन्यथा गुरुवारी पंचायत समिती कार्यालयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मिरज पंचायत समिती कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा निघणार.
यावेळी आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे सचिन दादा कांबळे विज्ञान माने मिरज तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अण्णासाहेब कोरे अण्णासाहेब खोत सुभाष तात्या खोत अभिजीत शेडबाळे प्रदीप सावंत निलेश सावंत जावेद मुल्ला निपू भैया परदेशी कपिल कबाडगे मंगेश यादव इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.