
सांगली : मालगावच्या ग्रामविकास अधिकारी यांचे निलंबन करण्यात यावे यासाठी मालगावचे उपसरपंच तुषार भाऊ खांडेकर यांचे आमरण उपोषणाला सहा दिवस झाले तरी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने जाणीवपूर्वक झोपेचे सोंग घेतले आहे. त्यांना जागे करण्यासाठी व तुषार भाऊ खांडेकर यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला जाग आणून ग्रामविकास अधिकारी जगताप यांचे निलंबन तात्काळ करण्यात यावे.
जर निलंबन झाले नाहीतर….
गुरुवार दिनांक 22.8.2024 रोजी मिरज पंचायत समिती कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार . असे निवेदन ( ता.20 ) रोजी जिल्हा परिषदेच्या मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटून सर्वपक्षीय पक्ष संघटनेच्या वतीने व समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने देण्यात येणार आहे.
तरी सर्वपक्षीय पक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व समस्त आंबेडकरी समाजातील कार्यकर्त्यांनी उद्या दुपारी चार वाजता जिल्हा परिषद कार्यालयामध्ये उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले.