मिरज : कामगार मंत्री ना. डॉ. सुरेशभाऊ खाडे व भाजपा ग्रामिण जिल्हाध्यक्ष निशिकांतदादा भोसले- पाटील यांच्या उपस्थितीत परशराम कोळी यांचा भाजप पक्ष प्रवेश

सुभाषनगर : येथे भाजप पक्ष प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी कामगार मंत्री तथा पालकमंत्री ना. डॉ. सुरेशभाऊ खाडे व भाजपा ग्रामिण जिल्हाध्यक्ष निशिकांतदादा भोसले- पाटील यांच्या उपस्थितीत परशराम कोळी यांनी भाजप पक्षात प्रवेश केला .
यावेळी बोलताना ना. सुरेशभाऊ खाडे यांनी मालगाव व सुभाषनगरच्या विकास कामासाठी दिलेल्या निधीची माहिती दिली. तसेच सुभाषनगरसाठी मंजूर पाण्याच्या टाकीचे काम त्वरित पूर्ण करण्याचे अश्वासन त्यांनी दिले. परसराम कोळी यांना आगामी काळात ताकद देऊ अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यावेळी बोलताना म्हणले की, ना. सुरेशभाऊ खाडे यांनी मिरज तालुक्याच्या विकासाला भरीव मदत केली आहे. तसेच ना. खाडेसाहेब हे सर्वसामान्यांचे नेतृत्व आहे. भाजप हा आमच्यासाठी फक्त पक्ष नसून तो आमचा परिवार आहे. या परिवारात परशराम कोळी यांना आम्ही चांगली संधी देऊ. भाजपा प्रचार प्रमुख काकासाहेब धामणे व धनंजय कुलकर्णी यांनी आपले मनागत व्यक्त केले. सत्कारदरम्यान उत्तर देताना परशराम कोळी म्हणाले की; पक्ष माझ्यावर जी जबाबदारी देईल ती यशस्विरित्या पूर्ण करेण तसेच भाऊंचे त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले.
यावेळी उपस्थित महिलांनी ना. सुरेशभाऊ खाडे यांना राखी बांधली व या कार्यक्रमाला मिरज भाजप विधानसभा प्रचार प्रमुख काकासाहेब धामणे, माजी जि.प. सदस्य अरुण राजमाने, माजी पंचायत समिती सदस्य किरण बंडगर, विधानसभा युवक प्रचार प्रमुख धनंजय कुलकर्णी, मालगावच्या सरपंच अनिताताई क्षीरसागर, टाकळी ग्रामपंचायत सदस्य मनोज नांद्रेकर, रावसाहेब लोखंडे, सुभाषनगर सोसायटी चेअरमन रावसाहेब चव्हाण, सोसायटी सदस्य नितीन चिंचवाडकर, अनिता शिंदे, मुसा गोदड, उदय वनकुंद्रे, अजित खोत, याचबरोबर अनेक भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकार, परसराम कोळी मित्र परिवार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.