
मिरज : आज मोहन वनखंडे सर यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेण्यात आली त्या पत्रकार परिषद बैठकीत मोहन वनखंडे सर बोलताना म्हणाले भारतीय जनता पार्टी व जनसुराज्य शक्ती पक्ष यांच्या संयुक्त विदमाने ‘रुद्रपशुपती’ग्राउंडवर मिरज सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर शुक्रवार दि 30 ऑगस्ट रोजी दहीहंडी चे आयोजन केले आहे.
मा.समित (दादा) कदम व मोहन वनखंडे सर युथ प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित केले आहे.
मागील वर्षाप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील मोठी दहीहंडी यावेळेस पण मोठया उत्सवात दहीहंडीचे आयोजन केले आहे.
या दहीहंडीस मोठे नेते व सिनेकलाकारांची या कार्यक्रमास हाजेरी लाघणार आहे .
येणाऱ्या ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 महिन्यांमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभामध्ये 281 मिरज मतदारसंघातुन उमेदवारी लढवणार असल्याचे स्पस्ट केले. भाजपा व जनसुराज्य महायुतीकडून मी इच्छुक आहे . त्यासाठी मी पक्ष श्रेस्टीकडे व कोयरकमिटीला उमेदवारीसाठी मागणी केली आहे.
मी 2000 सालापासून सक्रिय कार्यकर्ता व पदाधिकारी असून जत विधानसभा 2004 पासून 2009,2014,2019 या विधानसभा व लोकसभेसाठी प्रमुख प्रचार म्हणून काम केलेले आहे.
उमेदवारी का मिळावी?
मोहन वनखंडे सर पुढे बोलताना म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्था व पंचायत समिती,जिल्हापरिषद आणि महानगरपालिका या निवडणुकांमध्ये विजयश्री खेचुन आणण्यात माझा सिहांचा वाटा आहे. येत्या विधानसभामध्ये मिरज मतदारसंघात मी प्रमुख दावेदार म्हणून या मैदानात उतरत असल्याचे सांगितले.
निवडणूक लढवण्यास ठाम
2024 विधानसभा 281 मिरज मतदारसंघातुन निवडणूक लढवणार कोणत्याही परिस्थितीत व कोणत्याही बाजूने दबाव आला तरी आता माघार नाही . पत्रकार परिषदेत मोहन वनखंडे सरांना सवाल करण्यात आला की, जयंत पाटील व विशाल पाटील यांच्या संपर्कात आहेत का? त्यावर बोलत ते म्हणाले की मी कुणाच्या संपर्कात नाही. जर महाविकास आघाडीत उमेदवारी मिळाले तर लढणार का ? असे विचारले असता मोहन वनखंडे सर म्हणाले सध्या तरी महायुतीकडुन लढण्याची इच्छा असून महाविकास आघाडीचा अजून विचार केला नाही.
काहीही झाले तरी ही विधानसभा मी लढवण्यावर ठाम आहे .
2024 ही विधानसभा लढवणार .