
बोलवाड चे माजी उपसरपंच विद्यमान सदस्य भाऊसो नरगच्च यांचा वाढदिवस बोलवाडचे लोकनियुक्त माजी सरपंच सुहास दादा पाटील बोलवाड चे उपसरपंच सचिन दादा कांबळे ,महादेव दबडे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष मिरज माजी सरपंच पिंटू नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालय येथे केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
राज्याचे कामगार मंत्री नामदार सुरेशभाऊ खाडे यांच्या कार्यालयामध्येही मोठ्या उत्साहामध्ये केक कापून साजरा करण्यात आला. विविध मान्यवरांच्या हस्ते शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. विविध सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्याकडून भाऊसो नगरच्य यांना शुभेच्छा देण्यात आले आहेत.
बोलवाड तालुका मिरज आज भाऊसो नरगच्छ यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना भांड्याचे वाटप करण्यात आले.

बोलवडचे माजी लोकनियुक्त सरपंच सुहास पाटील यांनी शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलवाड चे उपसरपंच सचिन दादा कांबळे,मिरज विधानसभा क्षेत्रअध्यक्ष राष्ट्रवादी अजितदादा गट महादेव दबडे , माजी सरपंच पिंटू नाईक , लखन सर्वदे , हरून शिकलगार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.