
मिरज: भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे यांनी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा प्राध्यापक प्रमोद इनामदार ( राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष शरदचंद्र पवार गट ) यांची मागणी.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीचे गैरहजर राहणाऱ्या मालगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सुरेश जगताप यांच्यावर कारवाई करण्यासाठी मिरज पंचायत समिती समोर चालू असलेल्या उपोषणास पाठिंबा.
जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबनाची कारवाई करून योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे सोमवार पर्यंत कारवाई न केल्यास उग्र आंदोलन करण्याच्या इशारा प्रमोद इनामदार यांनी दिला आहे.