
मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेव दबडे यांनी धारेवर धरताच इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी धनश्री बांबुरे यांनी मिरज पंचायत समितीच्या दालनात सुरू असलेल्या मेळाव्यातून पळ काढला .
इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून मिरज पंचायत समिती कार्यालयात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळावा दरम्यान मोठा गदाराळ निर्माण झाला आहे. मोदी आवास योजनेचे अधिकाऱ्यांना विचारलेल्या प्रश्नांना व्यवस्थित उत्तर न देता आल्यामुळे सभागृहात मेळाव्यासाठी आलेल्या नागरिकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे.
त्यामुळे समाज कल्याण अधिकाऱ्यांनीपळ काढले आहे मागासवर्गीय बहुजन कल्याणकारी योजना सर्वसामान्यांना माहिती मिळावी यासाठी शासनाने करोडो रुपये खर्च करून शासनाच्या विविध योजना अमलात आणतात पण या योजनेचे अधिकार्यांनाच माहिती नसल्याने गोंधळ उडाला आहे.
राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष अजित दादा गटाचे नेते महादेव दबडे बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे पंचायत समिती सदस्य किरण बंडगर धारेवर धरत आयोजित मेळावा स्थगिती देऊन पुन्हा मेळाव्याचे आयोजन करण्याची मागणी करण्यात आली.
काही काळ मिरज पंचायत समितीच्या सभागृहात गोंधळ निर्माण झाल्यामुळे पुन्हा 23 तारखेला संपूर्ण माहिती घेऊन बैठक घेण्याचे धनश्री धनश्री बांबूरे सहसंचालक समाज कल्याण यांनी जाहीर केला आहे .योजना संदर्भात आढावा बैठक घेऊन पुन्हा 23 तारखेला बैठक घेण्याचे आयोजन केले आहे.