
‘लाडकी बहीण’ योजनेचे पात्र महिलांचे पैसे बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात ही 14 ऑगस्ट पासूनच झाली आहे. सरकारने जरी पैसे जमा होण्याची तारीख 17 ऑगस्ट दिली असली तरी ता.14 पासून सुरवात झाली आहे.
रक्षाबंधन पूर्वी पैसे बँक खात्यावर जमा झाल्याने महिलावर्ग मध्ये आनंद पसरला आहे. ज्या महिलांचे बँक खाते पैसे जमा झाले नाहीत त्यांचे कारण बँक सिडिंग स्टेटस आहे. त्या महिलांनी बँक खात्याशी आपले आधार नंबर लिंक करणयाची आवशक्यता आहे.
ज्या महिलांचे अर्ज अमान्य केले आहेत त्यांना पैसे मिळणार नाही.
पात्र असलेल्या महिलांचे अजूनही पैसे आले नाहीत त्या महिलांनी 17 ऑगस्ट पर्यँय वाट पहावी.
15 ऑगस्ट पर्यन्त तब्बल 48 लाख महिलांचा बँक खात्यावर पैसे पाठविण्यात आले आहे. 17ऑगस्ट पर्यंत पैसे पाट विण्याची प्रक्रिया चालू आहे.