सांगली :सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता अडचणीत येणार..कोट्यवधीचा घोटाळा उघडकिस आले आहे.

सांगलीचे विधमान आयुक्त शुभम गुप्ता हे आय एस अधिकारी प्रशिक्षणार्थी असताना असताना एक मोठा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे . या घोटाळ्याचा लेखाजोखा एबीपी माझाच्या हाती लागला आहे. सांगलीचे आयुक्त शुभम गुप्ता हे प्रशिक्षणार्थी असताना आदिवासी विभागात कार्यरत होते ,या विभागाचावतीने आदिवासीसाठी गायी म्हशी वाटपाची योजना राबविण्यात आली होती.त्या योजनेत शुभम गुप्ता हे प्रकल्प अधिकारी होते व त्यांनी या योजनेअंतर्गत मोठा भ्रष्टाचार केल्याचे व आदिवासींच्या पैशांचा मोठा झोल व घोटाळा केल्याचं समोर आलं आहे. सरकारच्या चौकशी समितीच्या अहवालात हे तपशीलवार नमूद करण्यात आलं आहे.
लाभार्थ्यांना नियमाबाह्य दुघ्ने पैसे देऊन दुसऱ्या खात्यावर स्वतःच वर्ग करून घेणं, लाभार्थ्यांना धमकावणं, नियमबाह्य कामांसाठी त्यांचंच विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना धमकावणं, बोगस पशूवैद्यक अधिकाऱ्यांच्या सह्या जोडणं असे अनेक गैरप्रकार सांगली महापालिकेचे विद्यमान आयुक्त शुभम गुप्ता यांनी केल्याचं सिद्ध झालं आहे.
शासनाच्या समितीच्या अहवालात हे तपशीलवार नमूद करण्यात आलं आहे, आणि हा अहवाल राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवण्यात आला आहे. त्याचं इंग्रजी भाषांतर करून केंद्र सरकारला कारवाईसाठी मागणी करण्यात येणार असल्याचे समजते.