
खटाव :मिरज तालुक्यातील खटाव गावातील खटाव ग्रामपंचायत कार्यालयाचा ध्वजारोहण लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे यांच्या हस्ते करण्यात आला आहे. सोमेश्वर विद्यालय खटावचे ध्वजारोहण खटावचे पोलीस पाटीलांच्या हस्ते करण्यात आला.
खटाव ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्य दिनाच्या अवधीसाधून पहली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना बक्षिसाचे वितरण खटावचे सरपंच रावसाहेब बडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
सर्वात जास्त बक्षीस ग्रामपंचायत चे माजी सदस्य रामचंद्र घोरपडे यांनी दिले आहे.अशाच पद्धतीने बक्षीसांचे वितरण झाल्यास विद्यार्थ्यांचा मनोबल वाढवण्यास मदत होईल असे रामचंद्र घोरपडे यांनी म्हटले आहे.

गावात ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी विद्यार्थ्याकडून झांज पथक व लेझीम चे आयोजन करण्यात आले होते.या स्वातंत्र्य दिनासाठी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.जिल्हा परिषदेतील मुख्याध्यापक सर्व शिक्षक सोमेश्वर विद्यालयातील सर्व शिक्षक मुख्याध्यापक ग्रामपंचायत कार्यालयातील सर्व सदस्य कर्मचारी ग्रामसेवक संजय गायकवाड उपस्थित होते.