खटाव येथील घनकचरा व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार

खटाव येथील घनकचरा व्यवस्थापन कामाचे भोंगळ कारभाराची चौकशी करा -संजय कागवाडे (ग्रा.प . सदस्य)

ता .मिरज : खटाव येथील स्वच्छ भारत टप्पा दोन अंतर्गत सन 2023 साली येथे सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य संजय कागवाड यांनी मा मुख्य कार्यकारी अधिकारी सौ .तृप्ती धोडमिसे यांच्याकडे निवेदनाद्ववारे चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केला आहे .

खटाव गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कामासाठी सुमारे 41,40 00 70 रुपयेचे निधी कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद सांगली यांच्याकडून तांत्रिक मंजुरी मिळाली होती . त्या अनुषंगाने सदर कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी चेअरमन विजय मजूर सहकारी सोसायटी लिमिटेड सांगली, तालुका मिरज जिल्हा सांगली यांच्या नावे कार्यारंभ आदेश देण्यात आला होता .

मक्तेदारानी प्रथम कामाला सुरुवात केली परंतू मक्तेदाराकडून अंदाजपत्रकाप्रमाणे काम करणे अपेक्षित असताना त्याप्रमाणे काम केले नसलेले दिसून येते व जे काम करण्यात आले आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले तरी सदर कामाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी ;असे निवेदन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांच्याकडे संजय कागवाडे यांनी केला आहे .

तसेच निवेदनाची प्रत कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद सांगली यांना तसेच उपविभागीय जलसंधारण अधिकारी पंचायत समिती मिरज देण्यात आल्याचे माहिती संजय कागवाडे यांनी दिले .

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button