महाराष्ट्र शासनाच्या धोरणामुळे क्रीडापटूंना स्थैर्य आणि सन्मान; मंत्री चंद्रकांतदादा पाटील

३७२ क्रीडापटूंचे शासकीय सेवेत थेट समावेशन; सांगलीत अखिल भारतीय कनॉईंग, कयाकिंग स्पर्धांचे उत्साही

सांगली (प्रतिनिधी) ५ एप्रिल २०२६ : “क्रीडा क्षेत्र हा आता केवळ छंद उरला नसून करिअरचा एक सक्षम पर्याय म्हणून समोर येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या सकारात्मक आणि कृतिशील धोरणामुळे राज्यातील क्रीडापटूंना आयुष्यात स्थैर्य आणि समाजात सन्मान प्राप्त होत आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज रविवार (ता.५) येथे केले.

भारतीय विद्यापीठे महासंघ (ए.आय.यू.) आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कनोईंग व कयाकिंग (पुरुष व महिला) स्पर्धांचे भव्य उद्घाटन मंत्री पाटील यांच्या हस्ते सकाळी कृष्णा नदीवरील रॉयल बोट क्लब येथे संपन्न झाले. मंत्री पाटील यांनी शासनाच्या विविध प्रोत्साहनपर योजनांचा आढावा घेतला:

🔺थेट शासकीय नोकरी: उत्तुंग कामगिरी करणाऱ्या ३७२ खेळाडूंना विनापरीक्षा थेट शासकीय सेवेत सामावून घेण्यात आले आहे.

🔺श्रेणीनिहाय पदे: आंतरराष्ट्रीय पदक विजेत्यांना ‘वर्ग १’, राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्यांना ‘वर्ग २’, तर राज्य स्तरावरील विजेत्यांना ‘वर्ग ३ व ४’ ची पदे देण्याचा निर्णय.

🔺भरघोस रोख पारितोषिके: आंतरराष्ट्रीय सुवर्णपदकासाठी २ कोटी, राष्ट्रीय स्तरावर १ कोटी आणि राज्य स्तरावर ५० लाख रुपयांची तरतूद.

🔺🌊 कृष्णा नदीचा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाच्या

अध्यक्षस्थानी असलेले शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी स्पर्धास्थळाचे महत्त्व अधोरेखित केले. “कृष्णा नदीवरील हा ९४० मीटरचा सरळ व अडथळेमुक्त ट्रॅक देशातील दुर्मिळ वैशिष्ट्यांपैकी एक आहे. पाण्याचा प्रवाह स्थिर असल्याने सर्व स्पर्धकांना येथे समान संधी मिळते,” असे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सन २०३६ च्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी सज्ज होत असून, देशात जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा उभारल्या जात असल्याचेही मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.या

सोहळ्याला आमदार धनंजय उर्फ सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, योगेश लोहकरे, संजय परमणे, काव्यश्री नलवडे आणि क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि ध्वजारोहणाने झाली. मंत्री महोदयांनी हिरवा झेंडा दाखवून प्रदर्शनीय सामन्यांना प्रारंभ केला.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button