सांगली जिल्हा परिषदेत महायुतीला मोठा धक्का; शिवसेनेच्या बंडाने महाविकास आघाडीचे वर्चस्व

सांगली (प्रतिनिधी), ता.१ एप्रिल २०२६ : सांगली जिल्हा परिषदेच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा ‘ट्विस्ट’ पाहायला मिळाला असून, शिवसेनेतील अंतर्गत फूट आता पूर्णपणे चव्हाट्यावर आली आहे. सभापती निवडीच्या प्रक्रियेत महायुतीला मोठा हादरा बसला असून, महाविकास आघाडीने सर्व जागांवर आपले वर्चस्व निर्माण केले आहे.

शिवसेनेच्या दोन सदस्यांचे बंड अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीनंतर शिवसेनेतील धुसफूस सुरू होती. आज झालेल्या सभापती निवडीवेळी शिवसेनेचे सदस्य पृथ्वीराज पाटील आणि जयदीप भोसले यांनी तटस्थ न राहता थेट महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. या दोघांच्या भूमिकेमुळे सत्तेचे समीकरण पूर्णपणे बदलले. आमदार सुहास बाबर यांना आपल्याच पक्षातील ही फूट रोखण्यात अपयश आल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.

महायुतीकडून एकही अर्ज दाखल न झाल्यामुळे ही निवड प्रक्रिया अत्यंत शांततेत आणि बिनविरोध पार पडली. महाविकास आघाडीने मोर्चेबांधणी करत आपले उमेदवार रिंगणात उतरवले होते. निवड झालेले नूतन सभापती

बांधकाम सभापती: पृथ्वीराज पाटील (शिवसेना बंडखोर गट)

महिला व बालकल्याण सभापती: स्नेहल मोरे

समाजकल्याण सभापती: दादासाहेब कोळेकर

शिक्षण व आरोग्य सभापती: सावित्री पाटील

राजकीय भूकंपानंतर जिल्हा परिषदेतील संख्याबळात मोठी तफावत निर्माण झाली आहे. सध्या महाविकास आघाडीकडे ३७ सदस्यांचे भक्कम पाठबळ असून, भाजप आणि मित्रपक्षांचे (महायुती) संख्याबळ २४ पर्यंत खाली आले आहे.

विशाल पाटलांचा ‘गेम प्लॅन’ यशस्वी?

सांगलीच्या राजकारणात खासदार विशाल पाटील यांची भूमिका नेहमीच महत्त्वाची ठरली आहे. त्यांनी यापूर्वीच जिल्हा परिषदेत मोठे फेरबदल होतील असे संकेत दिले होते. आजच्या निकालाने त्यांच्या शब्दाला वजन प्राप्त झाले असून, जिल्ह्याच्या राजकारणात महाविकास आघाडीची पकड अधिक घट्ट झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा आमचे न्यूज पोर्टल.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button